फलटण ! परतीच्या प्रवासात माऊलींचा पालखी सोहळा आज पाडेगाव मुक्कामी : उद्या पुणे जिल्हात प्रवेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
लोणंद : प्रशांत ढावरे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे आज दिनांक ०७ रोजी होणार आहे . त्याच पार्श्वभूमीवर पाडेगावचे सरपंच राहुल कोकरे यांनी सोहळ्यासाठीची आवश्यक तयारी झाल्याचे सांगत माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
          शुक्रवार दि.०७ रोजी संध्याकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी पाडेगाव ता. फलटण येथे विसावत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून साफसफाई , रस्त्यांची स्वच्छता ,पाणी शुद्धीकरण ,तसेच सार्वजनिक शौचालय  स्वच्छता , लाईटची सुविधा, वारकऱ्यांसाठी पाडेगाव उपकेंद्रामार्फत आरोग्य सुविधा अशा प्रकारच्या सर्व सोई सुविधांची तयारी करण्यात आलेली आहे. शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी निघेल, यादरम्यान निरा नदीवरील पाडेगाव हद्दीतील प्रसिद्ध दत्तघाट येथे माउलींच्या पादुकांना स्नान झाल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत सोहळा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. 

या सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारी घेऊन वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशी सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे. माऊलींच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच राहुल कोकरे यांनी दिली.
To Top