Bhor Breaking ! रांजे येथे पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गाजवळील शिवगंगा खोऱ्यातील रांजे ता.भोर येथे वीट भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील दीड वर्षाची चिमुकली खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.१ घडली.
     राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि.१ मौजे रांजे येथील दत्तात्रय शंकर गुजर यांच्या वीट भट्टीवर काम करणारे पिराजी गोविंद तोहरे सध्या रा.रांजे, मुळगाव पोळा ता. मुखेड जि.नांदेड यांची दीड वर्षाची मुलगी दिव्या पिराजी तोहरे ही चिमुकली वीटभट्टी शेजारील पाण्याच्या टाकीमध्ये खेळत असताना
 पडून मयत झाली.दिव्या हिला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच दिव्याचे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे हवालदार एस.एस.गायकवाड करीत आहेत.
To Top