सोमेश्वर रिपोर्टर टीम--
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथील बबुरावदादा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश अनिल धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे मावळते अध्यक्ष राजेंद्र बबुराव धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी ऋषीकेश धुमाळ यांची निवड करण्यात आली. १९४६ ची संस्थेची स्थापना असून आजतागायत संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था बारामती यांचे कार्यालया मध्ये ही निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एम बोबडे यांनी काम पाहिले.