सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याची जलवाहिनी असलेल्या हिरडस मावळ खोऱ्यातील निरा- देवघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.धरण पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून धरणात ९०% पाणीसाठा झाला आहे.
पुढील काळात संततधार पाउस सुरू राहिल्यास लवकरच धरण १०० % भरण्याची आशा आहे. संततधार पावसामुळे नीरा- देवघर धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत चालल्याने धरणाच्या विद्युतग्रहाद्वारे ७५० क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये बुधवार दि .२ सुरू करण्यात आला आहे.यामुळे सहा मेगावॅट वीज निर्मिती २४ तासात तयार होणार असून पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी-अधिक बदल होऊ शकतो.विसर्ग सुरू केल्याने नदीपात्रात कोणीही उतरू नये तर नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आवाहन पुणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल यांनी सांगितले.