सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्तासातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी तन्मय पवार याने १४ वर्षाखालील ७५ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होऊन जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
सदर स्पर्धेचे आयोजन २९ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती कुस्तीगीर संघ, बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती परिसरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तन्मयला वारंवार मिळत असते. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी अभिनंदन केले.