सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाघळवाडी आश्रमशाळेतील मुलांना १ लाख रुपये किंमतीच्या गणवेशाचे वाटप करण्यात आले.
वाघळवाडी ता बारामती येथे आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाघळवाडी आश्रमशाळेतील गरजू मुलांना १ लाख रुपये किंमतीच्या गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त संजय शिंदे, योगेश सोळस्कर, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, प्राचार्य रोहिणी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. अक्षय शिंदे फाउंडेशन असो वा आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट असो वेळोवेळी समाजातील गरजू लोकांसाठी धावून आले आहे. पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीना गॅस वाटप, मुलांना सायकल वाटप, गावोगावी अंगांवड्यांच्या इमारती, नीरा-बारामती रस्त्यावरील बस स्टँड, शाळेतील मुलांना टॅब वाटप, गरीब मुलांची शैक्षणिक फी अशा विविध माध्यमातून आज पर्यंत अक्षय शिंदे फाउंडेशन व आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने कामे केली आहेत.
यावेळी बोलताना सरपंच हेमंत गायकवाड म्हणाले, अक्षय शिंदे फाउंडेशन असो वा आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट हे नेहमी समाजातील उपेक्षित घटकांच्या हाकेला धावणारे ट्रस्ट आहे. विश्वस्त योगेश सोळस्कर म्हणाले अक्षय शिंदे फाउंडेशन व आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट हे शाळेतील गरजू मुलांना मदत करणारे एकमेव ट्रस्ट आहे. तर अध्यक्ष अजिंक्य सावंत कोविड नंतर गेली तीन वर्षे आश्रमशाळांना पूर्ण अनुदान मिळाले नसून आर एन शिंदे चॅरिटेबल ट्रस्टमुळे गोरगरीब मुले शिकत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चाबुकस्वार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक जावेद मोकाशी यांनी मानले.