बारामती ! मुरूमच्या लाल मातीत घुमतोय 'शडुडू'चा आवाज : जयमल्हार कुस्ती केंद्रातील दहा पैलवानांचे तालुकास्तरावर यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मुरुम येथील जय मल्हार कुस्ती केंद्रातील दहा जणांनी यश संपादन केले. 
        मुरूम येथील साळोबावस्ती नजिक जय मल्हार कुस्ती केंद्रातील १४,१७ व १९ वर्षे वयोगटात यश संपादन केलेल्या कुस्तीगिरांचे सत्कार करण्यात आले. आयुष तानाजी भंडलकर, समर्थ उमाजी भंडलकर,  कौस्तुभ सोमनाथ भंडलकर, संजय संजय शिंदे, सचिन आटोळे,  शिवराज जयकुमार भोसले,  शेखर सोमनाथ भंडलकर, धनराज निलेश मदने,  शंभुराजे साळुंखे, वीरेन रमेश साळुंखे यांनी तालुकास्तरावरील कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले. 
        याप्रसंगी वाणेवाडी न्यू इंग्लिश स्कूलचे शारीरिक शिक्षण संचालक अशोक भोसले,  मु.सा काकडे महाविद्यालयाचे प्रा. दत्तराज जगताप यांनी  मार्गदर्शन केले. बारामती दूध संघाचे माजी संचालक कौस्तुभ चव्हाण सर्व कुस्तीगिरांना मार्गदर्शन करणारे सौरभ जाधव, मल्हारी भंडलकर, बच्चन आटोळे, याप्रसंगी महाराष्ट्र जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर भंडलकर, दत्तात्रय भंडलकर,भाऊसाहेब भंडलकर, अंकुश भंडलकर, नंदकुमार भंडलकर, लखन भंडलकर उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार कौस्तुभ चव्हाण यांनी केले.
To Top