सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील एका गावात एका २५ वर्षीय महिला राहत आहे. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी दोन जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रजीत दिलीप शिंदे (वय 32, ), शिवाजी थोरवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 25 वर्षाची महिला एका गावातील गृहीणी आहे. तिच्या घरासमोर दि.27 रोजी इंद्रजित शिंदे आणि त्याचा मित्र शिवाजी थोरवे हे गेले तेथे इंद्रजित याने त्या महिलेला मोबाईलवर मेसेज केला की तू मला भेट नाहीतर तुझ्या माझ्या संबंधबाबत तुझ्या नवऱ्याला मी सांगेन असे म्हणून शिवीगाळ करत पोलिसात तक्रार केलीस तर तुझ्या घरातील लोकांना मारून टाकेन, अशी धमकी देत शरीर सुखाची मागणी केली. शरीर सुख नाही दिले तर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी देऊन निघून गेले म्हणून दोघांवर गुन्हा दाखल केला असून याचा तपास ए एस आय टकले करत आहेत.