खंडाळा ! विद्यार्थ्यांसह नागरिकांची रेल्वेरूळ ओलांडण्यापासून होणार मुक्तता : लोणंद येथे भुयारी मार्गासह ओव्हरब्रीजही मंजूर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील 'लोणंद रेल्वे संघटने'च्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून लोणंद साठी भुयारी मार्गासह ओव्हरब्रिज देखील मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला आहे.
       लोणंद येथील लोणंद रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे लोणंद येथील जुन्या फलटण रोड जवळील बुटीयानी हॉस्पिटल येथे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थींच्या तसेच लोणंदच्या पुर्वेस असणाऱ्या वसाहतींसाठी  छोटी चारचाकी वाहने येजा करू शकतील अशा चार मिटर रुंद व तीन मिटर उंच भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे तर लोणंदच्या आग्नेय दिशेस असणाऱ्या सईबाई हौसिंग सोसायटी तसेच आयटीआय, मार्केटयाड परिसराला जोडणारा ओव्हर हेड ब्रिज हा शास्त्री चौकातून रेल्वे ट्रॅक ओलांडून पूर्व बाजूस कापडगाव ला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत केला जाणार आहे. आगामी २५ वर्षांचा विचार करून सदरचा ब्रिज भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या ‘महारेल’ उपक्रमांतर्गत दुचाकी चार चाकी वाहने बसतील या पद्धतीने बनवण्यात येणार आहे. या दोन्ही कामासंदर्भात पाहणी करण्यासाठी आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेकडून (Central railway) सिव्हिल इंजिनिअर यादव यांनी भेट दिली.
           यावेळेस लोणंद प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश हेब्बार, गिरीश रावळ, प्रदिप क्षीरसागर, संघटनेचे सचिव निखिल काळे, हेमंत वधानी, राजेश, बंटी घाडगे, अभिजीत शिंदे, पारस शहा आदी मान्यवर उपस्थित होते

To Top