सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२२-२३ चा अंतिम ऊसदर प्रति टन ३ हजार ४११ रुपये जाहीर करण्यात आला.
बुधवार (दि.३०)रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ऊसदर जाहीर केला. सदरचा ऊस दर हा सोमेश्वर साखर कारखान्या पेक्षा प्रतिटन ६१ रुपये जास्तीचा आहे.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव,सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते. शेजारील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच ३ हजार ३५० रुपये प्रति टन ऊसदर जाहीर केला आहे.