बारामती ! रात्रीच्या अंधारात वाहनांच्या लाईट बंद करून चालायची वाळूची चोरटी वाहतूक : ३३ लाख ८० हजारांच्या मुद्देमालासह सुपे पोलिसांनी केला पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जळगाव-कऱ्हाटी परिसरात वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी सुपे पोलिसांनी ३३ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  
      सविस्तर हकीकत अशी,आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुपा पोलीस स्टेशन हददीतील कऱ्हाटी गावचे हददीत कन्हा नदी पात्रामध्ये अवैदय रित्या वाळु उपसा चालु असलेबाबत गोपनीय माहीती बातमीदारामार्फत प्राप्त झालेने सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील, राहुल भाग्यवंत,  सचिन दरेकर, होमगार्ड धायगुडे असे मिळुन खाजगी वाहनाने रवाना होवुन मौजे काहाटी गावातुन जळगाव या गावाकडे जाणारे रस्त्याचे कडेला अंधारात दबा धरून बसलो असता, पहाटे ०३/३० वा. चे दरम्यान जळगावकडुन गावातुन दोन संशयीत ट्रक लाईट बंद करून काहाटी गावचे दिशेने येताना दिसल्या. 
       सदर संशयीत ट्रकला हात करून थांबावुन चालकाकडे चौकशी केली असता दोन्ही ट्रकमध्ये अवैदयरित्या विना परवाना वाळु असल्याचे निष्पन्न झाले. अवैदय वाळु वाहतुक करणारे ट्रक चालक यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरचे ट्रकचे मालक हे पाठीमागे स्विप्ट गाडीमध्ये आहेत असे सांगीतले सदरची स्विप्ट कार नं. एम. एच १२ एन. ई ७८८१ व त्यातील दोन इसमांना ताब्यात घेवुन सुपा पोलीस स्टेशन येथे आणुन ट्रक चालक १) महेश राजेंद्र यादव वय ३१ वर्षे रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद २) चेतन मारूती वाबळे वय २५ वर्षे रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे, ट्रक मालक ३) आकाश रावसाहेब व्यवहारे रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे ४) नामदेव पोपट वाघमोडे रा. उरूळीकांचन ता. हवेली जि. पुणे व वाळु भरून देणारे ५) देवा जगताप पुर्ण नांव माहित नाही रा. जळगाव ता. बारामती जि. पुणे याचे विरूध्द भारतीय दंड संहिता, कलम ३७९, ३४ पर्यावरण सरंक्षण अधिनियम कलम ९,१५ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईमध्ये १० ब्रास वाळु किंमत अंदाजे ८०,०००/- रू टाटा कंपनीचा ट्रक नं. एम.एच. १२ डी. जी. ०४४२, टाटा कंपनीचा ट्रक नं. एम.एच १२ एन.एक्स. ३४३३ अशा दोन ट्रक किं.अं. ३०,००,०००/-रू, एक स्विप्ट कार नं. एम. एच.१२ एन.ई ७८८१ किं अं. ३,००,०००/- असा एकुण ३३,८०,००० /- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन यातील चार आरोपींना अटक करण्यात आली, व ०१ आरोपी फरार आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे हे करीत आहेत.
     सदरची कारवाई ही अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, तसेच अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे उपविभाग बारामती, सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उप निरीक्षक समाधान लवटे, पोलीस उप निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहा. फौजदार रविंद्र मोहोरकर, पो. हवा  राहुल भाग्यवंत, पो. नाअनिल दणाणे, पो.ना. संदिप लोंढे, पो.कॉ  सचिन दरेकर, पो.कॉ. तुषार जैनक, होमगार्ड  दिपक धायगुडे, होमगार्ड रविंद्र धायगुडे यांनी केली आहे.
To Top