सोमेश्वर रिपोर्टर टीम---
नीरा : विजय लकडे
सातारा-नगर रस्त्यावर निरे पासून मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुळुंचे हद्दीत चालता ट्रक लूटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी ५ बियरचे बॉक्स लंपास केले आहेत.
पुरंदर तालुक्याच्या गुळुंचे गावाच्या हद्दीत औरंगाबादवरून सातारा च्या दिशेने निघालेला ट्रक क्र. एमएच ११ डी डी २२८६ हा बियर घेऊन निघाला असता. गुळुंचे-चौधरवाडी दरम्यान रात्री अडीच वाजण्याच्या सुसारस चोरट्यांनी चालत्या गाडीतून सुमारे ५ बियरचे लांबवले. यामहिन्यात चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी करत आहेत.