सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
जिल्ह्यात सुसाईड पॉइंट म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून नदी पुलावर निलेश महादेव काकडे वय-४० रा.पुणे यांची दुचाकी आढळून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निलेश काकडे व त्यांच्या पत्नी यांच्यात आठ दिवसापूर्वी काही किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. भांडणाचा राग मनात धरून निलेश यांची पत्नी आठ दिवसापूर्वी घर सोडून निघून गेली असल्याने चिखली( पिंपरी चिंचवड )पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे.अजून पत्नीचा शोध लागत नसल्या कारणाने निलेश आपल्या मेहुण्याच्या घरी राहण्यास गेला होता. परंतु तेथून पुणे येथे कंपनीत जातो असे सांगून दि.८ निलेश घारातून निघून आला आहे. त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. दि ८ रात्री निलेश याच्या वापरात असलेली स्कूटी गाडी एमएच ५० व्ही १३४७ नीरा नदी पुलावर मध्यभागी आढळून आली. त्यानुसार नातेवाईकांनी खबरी जबाब राजगड पोलीस ठाण्यात दिला आहे.नीरा नदी पुलावर वापरत असलेली गाडी आढळून आल्याने आत्महत्या