सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

शिरोळ ! शिरटी-घालवाड रस्ता करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको : शासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी 
शिरटी ते घालवाड पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून याचा नाहक त्रास ग्रामस्थांबरोबर वाहनधारकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे २ ऑक्टोंबर पर्यंत रस्त्याचे काम सुरू न केल्यास  महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी युवा संघटनेचे नेते सौरभ शेट्टी यांनी दिला रस्ता दुरुस्तीसाठी शिरोळ मध्ये केलेल्या रस्ता रोको आंदोलनावेळी दिला दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे उपअभियंता एन के कांबळे यांनी एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर  रस्ता रोको   आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद बांधकाम  विभागाचे उपअभियंता बदडे हे उपस्थित होते  रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या
शिरटी  घालवाड कुटवाड कनवाड   येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिरटी ग्रामपंचायत आणि   ग्रामस्थांच्यावतीने शिरटी ते घालवाड ते शिरोळ  हा  रस्ता त्वरित करावा या मागणीसाठी शिरोळ नरसिंहवाडी या  मुख्य मार्गावरील  शिरटी फाटा वरील जनता हायस्कूल येथे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी युवा नेते सौरभ शेट्टी हे बोलत होते  आंदोलनकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त व्यक्त करीत असताना    शासनाच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त केला हसुर शिरटी येथील नागरिकांना महापुराच्या काळात सुरक्षित स्थळी अथवा   शिरोळला जाण्यासाठी हा शिरटी ते घालवाड हा रस्ता एकमेव मार्ग आहे  या त्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने रस्त्यावरून चालत जाणे देखील मुश्किल झाले आहे गेली पाच वर्षे झाले  हा रस्ता करावा म्हणून वेळोवेळी आंदोलन केली लेखी मागणी केली परंतु शासनाने दखल घेतली नाही  हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे परंतु अद्याप कामास  सुरुवात करण्यात आलेली नाही  त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित होण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे
यावेळी बोलताना शिरटीचे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की  शिरटी ते घालवाड  हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे  याच रस्त्यावर हायस्कूल महावीर नगर व ग्रामस्थांची शेती असल्याने शेकडो लोक या रस्त्यावरून दररोज ये जा करीत असतात या रस्त्यावर चालत जाणे देखील मुश्किल झाले असून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही आश्वासना पलीकडे काही पदरात पडले नाही तातडीने रस्ता दुरुस्त करावा यासाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून लवकरच या कामात सुरुवात करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी दहा वाजता शिरटी कनवाड कुटवाड घालवाड मार्गे मोटरसायकल रॅली काढून शिरोळ येथे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी शिरटीचे उपसरपंच प्रकाश माळी माजी उपसरपंच सागर पवार सतीश चौगुले आलम मुल्लाणी सुनील माळी रामचंद्र कोगनोळे रमेश मोरे महेश हत्ती  राजकुमार शिरगावे वैभव पवार रोहन पवार दीपक मगदूम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता,

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : शिरोळ ! शिरटी-घालवाड रस्ता करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको : शासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
शिरोळ ! शिरटी-घालवाड रस्ता करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको : शासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjt6blLPQuQlaRUzfW96rY2hMxdhTLN1gwTLeLuk_0HqY00zOTfuc3-Bg96RJY-spvn2B49Z9S0y5IyEw2owz4h2Ye1Kuwf15NOa6X9PHGJtfYdg7A7KaQAnBMMx9idg8vAyV31Lf0kd2KqAMRUcRdmkgR-mUGiZJWGK-Ody4y25aYbniS4fBsIc0e3grp_
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjt6blLPQuQlaRUzfW96rY2hMxdhTLN1gwTLeLuk_0HqY00zOTfuc3-Bg96RJY-spvn2B49Z9S0y5IyEw2owz4h2Ye1Kuwf15NOa6X9PHGJtfYdg7A7KaQAnBMMx9idg8vAyV31Lf0kd2KqAMRUcRdmkgR-mUGiZJWGK-Ody4y25aYbniS4fBsIc0e3grp_=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_23.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_23.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy