खंडाळा ! मोहित देवधर ! सारोळा पुलावरून आत्महत्या केलेल्या निलेश काकडे यांचा मृतदेह सापडला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : मोहित देवधर
बुधवार दिं ९ रोजी पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावर मध्यभागी दुचाकी लावत निलेश महादेव काकडे (वय 40,मूळ रा.उगलेवाडी हजारमाची ता.कराड सध्या रा.जाधववाडी,पिंपरी चिंचवड,पुणे ) या इसमाने
 नीरा नदीपाञात उडी मारुन आत्महत्या केल्याची भिती व्यक्त झाल्यानंतर दिं १० पासुन शोधमोहिम सुरु झाली होती. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दिं ११ रोजी संध्याकाळी सदर इसमाचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला. 
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,पुणे याठिकाणी कंपनीमध्ये कार्यरत असणारे निलेश काकडे यांचे व पत्नी पल्लवी काकडे यांचे 1 आँगष्ट रोजी झालेल्या किरकोळ वादातून पत्नी पल्लवी हि मुलीसमवेत निघून गेल्याची फिर्याद पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलीस स्टेशनला 4 आँगष्ट रोजी निलेश काकडे यांनी दिली होती. निलेश काकडे हे तेव्हापासून आपले मेहुणे प्रवीण लंगडे यांच्याकडे राहण्याकरीता म्हसवड जि. सातारा याठिकाणी होते. दरम्यान मंगळवार दि.8 आँगष्ट रोजी निलेश काकडे हे कंपनीमध्ये जाण्याकरीता आपली दुचाकी (क्रं.एमएच-50-व्ही-1347) वरुन म्हसवड येथून पुणेकडे निघाले होते. यावेळी निलेश काकडे यांनी सारोळा पुलावर पुणेहून साताऱ्याला जाणाऱ्या दिशेस आपली दुचाकी लावल्याचे निदर्शनास आले होते. निलेश काकडे यांचा दुरध्वनी बंद असल्यामुळे प्रवीण लंगडे हेहि शोधाशोध करीत होते. यावरून संबंधित निलेश काकडे यांनी सारोळा पुलावरुन नीरा नदीपाञात उडी मारल्याची शक्यता व्यक्त होती. याबाबतची बेपत्ता असल्याची नोंद किकवी पोलीस दुरक्षेञात झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश लडकत हे करीत आहेत.
----------------
रेस्क्यू टिमकडून शोधमोहिम..!
सारोळा पुलावरुन निलेश काकडे यांनी उडी मारल्याची शक्यता गृहीत धरुन दोन दिवसांपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टिम, महाबळेश्वर व शिरवळ रेस्क्यू टिम, पत्रकार मुराद पटेल यांच्याकडून शोध मोहिम चालु होती.
To Top