सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
कोण म्हणतंय देत नाय...घेतल्या शिवाय राहत नाय : एकेकाळी सोमेश्वर कारखान्याच्या गेटवर ऊसदरासाठी घोषणा देणाऱ्या शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाकडून सोमेश्वर कारखान्याने एफआरपी पेक्षा टनाला जादा ऊस दर देत राज्यातील ऊसदराची कोंडी फोडत राज्यात टनाला ३३५० दर दिल्याबद्दल
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी सोमेश्वर कारखान्यावर येत यांचेकडून सोमेश्वर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाचा विठ्ठलाची मूर्ती देत सत्कार केला.
सोमेश्वर कारखान्याने अनेक आंदोलने अनुभवले आहेत एकवेळ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार देखील कारखान्याच्या गेटवर कोण म्हणतं देत नाही.. घेतल्या शिवाय राहत नाही... अशा घोषणा सोमेश्वर कारखान्यावर दिल्या होत्या. सोमेश्वर कारखान्याने राज्यामध्ये एफ आर पी पेक्षा ५०० रुपये ज्यादा देत उच्चांक प्रस्थापित केला. शेतकरी संघटनेने कारखान्यावर येऊन संचालक मंडळाचा यथोचित सत्कार केला. वारणा कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात उसाला प्रति टन ४ हजार रुपये दर जाहीर केला होता. परंतु त्या कारखान्याने प्रत्यक्षात टनाला ३२०० देखील पुरे करू शकले नाहीत. सोमेश्वर कारखान्याने सर्वांगीण प्रगती साधत ऊस दराचा जो आदर्श निर्माण केला आहे तो राज्यात आदर्शवत असल्याचे विठ्ठल पवार यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिती खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, किसन तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.