Indapur Breaking ! भिगवण येथे हॉटेल व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : आकाश पिसाळ
भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सायंकाळी घडली. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळाली नाही.
           याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण येथील प्रसिध्द मासे खानावळीचे मालक विशाल धुमाळ यांच्यावर हे प्राण घातक वार झालेले आहेत. पुणे सोलापूर महामार्गा वरील दौड हद्दीतील हॉटेल ज्योती व्हेज समोर हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. दौड हद्दीतील गुन्हा असला तरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे.तसे च याची माहिती दौड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.सदर् हल्लेखोर एकटाच होता की त्याचे साथीदार याबाबताची माहिती मिळाली नाही .मात्र हा जिवघेना हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.जखमी धुमाळ यांना भिगवण येथील यशोधरा आय सी यु या खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारसाठी बारामती हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना संपर्क केला असता हल्लेखोराला त्याच्या ताब्यात असणाऱ्या धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले असून याची माहिती दौड पोलीस ठाण्याला दिली आहे. तसेच जखमी धुमाळ यांची प्रकृती स्थिर असून भिगवण शहरात शांतता कायम असल्यामुळे कोणत्याही अफवाना बळी पडू नये असे आवाहन केले आहे
To Top