बारामती ! हातात कोयता घेवून बारामती शहरात दहशत माजवणारा पोलिसांकडून जेरबंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातालगत जळोची गावालगत हॉटेल कॉर्नृर कटटा येथे एक तरूण हातात तलवार घेवून मोठमोठयाने आरडा ओरडा करून तलवार दाखवून निर्माण करून माझा नाद करायचा नाही एका एकाला तोडून टाकतो असे म्हणत कोयता हवेत फिरवत होता. बारामती पोलिसांनी उमेश खोमणे वय २६  रा. पिंपळी ता. बारामती याला पोलीस खाक्या दाखवत ताब्यात घेतले आहे. 
           एक युवक हातात कोयता घेऊन दहशत माजवत आहे. याबाबतची माहीती गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना मिळाल्याने त्यांनी सदर किठाणी जावून कार्यवाही करने बाबत आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी लागलीच सदर ठिकाणी जावून कार्यवाही करणेसाठी पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ पाठविला असता सदर ठिकाण तो युवक हातात कोयता घेवून फिरवत दहशत माजवित असताना मिळून आला त्या यवकास कोयत्यासह ताभ्यात घेवून त्याचे विरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा तपास चालू आहे.
      सदर कार्यवाही मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि वाघमारे, सहाय्यक फौजदार जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल निकाम चालक मोघे होमगार्ड नागे यांनी सदरची कामगीरी केलेली आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार काळे हे करीत आहे.
To Top