Bhor Breaking News ! भोर शहरात चोरट्यांनी पाच दुकाने फोडली : कागदपत्रांसह रोख रक्कम लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील रामबाग रोडवरील पाच हार्डवेअरची दुकाने भुरट्या चोरांनी मंगळवार दिं.२६ पहाटेच्या दरम्यान फोडल्याची घटना घडली असून दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी दुकानांमधील कागदपत्रे तसेच २० ते २२ हजारांची रोख रक्कम पळवली.
      रामबाग रोडवरील गायत्री ट्रेडर्स,अंबिका हार्डवेअर, शेतकरी कृषी सेवा स्टोअर्स,परदेसी इंटरप्राईजेस,सुयोग ट्रेडर्स अशा पाच दुकानांची कुलूपे कापून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करीत मुद्देमाल लंपास केला.घटनास्थळी भोर पोलीस पोचले असून तपास सुरू आहे.
To Top