सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत बंद पाईपलाईनद्वारे जवळार्जुनला देणार असल्याचे मत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
जवळार्जुन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटी हॉलमध्ये पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदावरून आ. संजय जगताप बोलत होते. यावेळी जवळार्जुन सोसायटीने सभासदांना 12 टक्के लाभांशाचे वाटप आ. संजय जगताप यांचे हस्ते करण्यात आले. आ. संजय जगताप यांनी सांगितले की पुरंदर उपशामधून जवळार्जुन व नाझरे बऱ्याच दिवसापासून वंचित आहेत तो पुरंदर उपशाचा प्रश्न डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपस्थित सभासदांना दिले.
यावेळी मार्केट कमिटी चे मा सभापती नंदूकाका जगताप, उत्तमराव शिंद, देवा नाझीरकर, अण्णासाहेब राणे, सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, मामासाहेब गुळूमकर, श्री.ऊरवणे, श्री. खैरे, आप्पा राणे, महेश राणे, सुभाष कुतवळ, सयाजी राणे, व्हाईस चेअरमन नवनाथ राणे सर्व संचालक मंडळ व सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभासदांना 12% लाभांश चे वाटप करण्यात आले. प्रस्ताविक सचिव हनीफ भाई सय्यद यांनी तर स्वागत चेअरमन महेश राणे यांनी केले लेखनिक बाबू साळुंखे यांनी सहकार्य केले.
COMMENTS