सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भाबवडी - खानापूर ता.भोर महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर भाबवडी पुलाशेजारी गुरुवार दि.२१ रात्री नऊच्या सुमारास बिबट्या चक्क रस्त्यावरून जाणाऱ्या चार चाकी वाहनासमोर आला. मात्र काही वेळातच त्याने गाडीची लाईट पाहून पुन्हा गिरकी मारून जंगलाकडे धाव घेतली.
भाबवडी - खानापूर मार्गावरून आंबाडेकडून येणारे न्यू इंग्लिश स्कूल संगमनेरचे मुख्याध्यापक रोहिदास जगताप यांच्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्या आला. काही क्षणातच गाडीची लाईट पाहून बिबट्याने गिरकी मारीत जंगलाकडे धूम ठोकली.बिबट्याचे दर्शन झालेल्या ठिकाणापासून ३० ते ४० फुटावरती दोन तरुण रस्त्याने फिरत होते.तरुणांना या घटनेची काहीच कल्पना नसल्याने काहीही अनर्थ घडू शकला असता मात्र रोहिदास जगताप यांनी तरुणांना घटनेची माहिती देत सावध केल्याने अनर्थ टळला.
------------------------
घाबरून जाऊ नका वनविभागाला कळवा
वीसगाव खोऱ्यातील परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.भाबवडी येथील घटनेची वनविभागाकडून खातरजमा केली जाईल. उपाययोजना म्हणून नागरिकांनी रात्री-अपरात्री एकटे घराबाहेर पडू नये.तर लहान मुलांनाही घराबाहेर सोडू नये तसेच घाबरून न जाता बिबट्या
असल्याचे समजल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी केले.
COMMENTS