सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी-मळशी ता. बारामती येथील जोतिबा विविध कार्यकारी सोसायटीने २०२२-२०२३ सालातील भागभांडवलावर सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. वार्षिक अहवालाचे वाचन सचिव मनोज जगताप यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेतून सर्वांच्या सहमतीने सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष काकडे म्हणाले की, संस्थेची प्रगती चांगल्या प्रकारे होत असून संस्थेने आतापर्यंत १०० टक्के वसूल बँकेला दिला आहे. तसेच संस्थेचे खेळते भागभांडवल ४ कोटी ६० लाख रुपये आहे. यावेळी संस्थेचे मा. सचिव धन्यकुमार जगताप यांचा सत्कार करण्यात आला.