सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
कराडकडून कल्याणच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो क्र. एम.एच. ०३ डिव्ही ४४७१ हा महादेव मंदिर निरा ता. पुरंदर येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाला अंतर्गत नीरा गोरक्षकदल निरा या संघटनेच्या तरुणांनी नीरा पोलिसांच्या मदतीने पकडला.
सदरील टेम्पोमध्ये एकूण २० जनावरे होती. यामध्ये १२ मोठ्या म्हशी ४ लहान रेडे तर ४ लहान कालवडी यांना अगदी दाटीवाटीने कोंबून रसिने आवळून बांधून
ठेवलेल्या आढळले. हिरा गोरक्षक दलाचे तरुण अक्षय शिरसागर, मनोज शिरसागर, गौरव पिसाळ, रुषी थोरात प्रशांत पाटोळे यांनी निरा पोलीस दुरक्षेत्रास कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी पोलीस हवालदार मदने. पोलीस नाईक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल जाधव रामभाऊ कर्णवर. पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी सदरहू टेम्पोची तपासणी करून. यातील जेंद अब्दुल खान रा कल्याण मुंबई. अरबाज ताहीर मलिक रा कल्याण मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.