भोर ! पुणे-बेंगलोर हायवेवर घरफोडी करणाऱ्या चार जणांना सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडले : राजगड पोलिसांची दमदार कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे- सातारा महामार्गलगतच्या धांगवडी ता.भोर हद्दीतील आर के इंडट्रीज कंपनीतील व घरफोडी करणारे चार आरोपींना  राजगड पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि.२ रोजी राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना रात्रगस्तीवर असणारे पोलीस नाईक निंबाळकर यांनी पहाटे ०३:१५ वा चे सुमारास पुणे-बेंगलोर हायवे रोडवर गस्त करत असताना आर के इंडट्रीज कंपनीच्या बाहेर एक पिकअप गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी रात्रगस्त अधिकारी पोलीस उप निरीक्षक विनय झिंजुर्के यांना त्याठिकाणी स्टाफसह जाण्याचे आदेश दिले. पोसई झिंजुर्के, पो.ह. सूर्यवंशी, व स्टाफ असे सरकारी वाहनाने त्याठिकाणी दाखल झाले.पोलिसांना अधिक संशय बळावल्याने ते सर्वजन त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी पोलीस आल्याचे पाहताच कंम्पाउंडचे आतमधील काही इसमांनी कंम्पांउडवरून उड्या मारून कापूरहोळच्या दिशेने जोरात पळ काढला. पिकअपमधील चालक वेगाने गाडी कापूरहोळच्या दिशेने घेवून पळुन जावू लागला. पोलीसांनी सर्व्हिस रोड व मेन रोडच्या मध्येच पिकअप गाडी पकडली चालक उडी मारून पळून जात असतानाच पोलीसांनी त्याचा पाठलाग करून तेथेच पकडले. पळून गेलेल्या इसमांचा पोलीसांनी पुणे-बेंगलोर हायवेवर स्थानिक नागरिक मिलींद जगताप,सागर जगताप, रामदास जगदाळे व इतर यांचे मदतीने पाठलाग करून कापुरहोळ याठिकाणी पकडून ताब्यात घेतले.आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांची नावे  बाळासाहेब हनुमंत साळुखे वय ३२ वर्षे, रा. पावर हाउस, फुरसुंगी ता हवेली जि पुणे, विजय संजु म्हस्के वय २२ वर्षे रा बिबेवाडी, पुणे. सुमित विनोद शिंदे वय २४ वर्षे रा. पावर हाउस फुरसुंगी ता हवेली जि पुणे, भुषण विठठल शिंदे वय २८ वर्षे रा. पावर हाउस फुरसुंगी ता हवेली जि पुणे असे असल्याचे समजले. पोलीसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या पिकअप गाडी नं एम एच १२ एस एक्स ०१९७ मध्ये फिर्यादी यांचे  आर के इंडट्रीज कंपनीच्या एकूण ६ मोटारी, २) कारडींग मशीनचे पार्ट,कॉपरची आरमाडा केबल, गुन्हयातील पिकअप गाडी असा एकूण ७,१६,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मा.भोर न्यायालया समक्ष हजर करण्यात आले असून पोलीस आरोपींकडे अधिक तपास करत आहेत.
          सदरील कामगिरी. पोलीस अधीक्षक  अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग तानाजी बेर्डे यांचे मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलीस उप निरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस अंमलदार एम. एम. निबांळकर, पो. ह. सुर्यवंशी, पो.ह. चव्हाण पो.ना.मदणे, पो. ना. लडकत, पो. कॉ. राजिवडे, पो. कॉ. नरूटे, पो.कॉ गव्हाणे तसेच पोलीस मित्र मिलींद जगताप, सागर जगताप, रामदास जगदाळे, रघुनाथ आहिरे यांचे पथकाने केलेली आहे.
To Top