सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

वाई ! 'तो' फसवणूक करून करायचा ट्रकची परस्पर विक्री : वाई पोलिसांनी तीन ट्रक ताब्यात घेत हडपसर येथून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
फसवणूक करुन परस्पर विकलेले सुमारे ३३ लाख १० हजार रुपये किंमतीचे तीन ट्रक हैद्राबाद, कर्जत / जामखेड, खुल्ताबाद (औरंगाबाद) येथुन आरोपीसह वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अब्दुल कादीर मोहम्मद अली सय्यद वय ५१ वर्षे मुळ रा सुपा ता पारनेर जि अहमदनगर सध्या रा २४ / अ गल्ली नं २४ महंम्मदवाडी रोड सय्यदनगर, हडपसर, पुणे हा अनेक दिवसांपासुन फरारी होता. सदर आरोपी हा हडपसर येथे येणार असल्याचे वाई पोलीस ठाणेचे परि. सहा पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांस त्यांचे बातमीदारां मार्फत माहिती प्राप्त झाल्याने, त्यांनी वाई पोलीस ठाणेचे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.हवा भोईर, पो. शि १२५५ राठोड, पो. शि ७९७, पो. शि प्रेमजीत शिर्के यांस सदर आरोपीस अटक करण्याचे आदेश दिल्याने वाई डीबी पथकाने हडपसर येथे दिनांक २५/०८/२०२३ रोजी सापळा रचुन पाहिजे आरोपी अब्दुल कादिर मोहम्मद सय्यद यांस ताब्यात घेऊन त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली होती. त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास करता, त्याने आयशर क्र एम. एच. ११ ए. एल. ४९६६ हे वाहन हैद्राबाद येथे विकल्याचे सांगितले. तसेच टाटा टिपर क्र एमएच १२ पीक्यु ४२२० हा कर्जत / जामखेड अहमदनगर येथे व डंम्पर वाहन क्र एमएच ११ सीएच ५१९१ हा धुळे किंवा खुल्ताबाद, संभाजीनगर येथे विकल्याचे सांगितले. तसेच याच आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर अशाच फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरबाबत वाई पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. सहा पोलीस अधिक्षक साो कमलेश मीना यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांस फसवणुक करुन परस्पर विकलेले ट्रक जप्त करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषण करुन तपासकामी रवाना होऊन त्यांनी आयशर ट्रक क्र एमएच ११ एएल ४९६६ हा दिनांक २७/०८/२०२३ रोजी हैद्राबाद येथील बेगमपुरा पोलिस ठाणेचे हद्दी मधुन मौला अली या व्यक्ती कडुन सापळा रचुन ताब्यात घेतला. तसेच दिनांक २९/०८/२०२३ रोजी डंम्पर क्र एमएच १२ पीक्यु ४२२० हा कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील रेहकुरी गावाचे हद्दीमधुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आला व दिनांक ३०/०८/२०२३ रोजी डंम्पर वाहन क्र एमएच ११ सीएच ५१९१ हे वाहन संभाजीनगर मधील खुल्ताबाद पोलीस ठाणेचे हद्दी मधील पिंपळगांव घनसावंगी या गावातुन सापळा रचुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. असा एकुण सदर गुन्हयातील ०३ ट्रक, डंम्पर (३३ लाख १० हजार रु.) किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. कमलेश मीना परि. सहा. पोलीस अधीक्षक, पोलीस उप निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, श्री. बिपीन चव्हाण, पोलीस हवालदार राहुल भोईर, पोलीस अंमलदार हेमंत शिंदे, श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेमजीत शिर्के यांनी केली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7306,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : वाई ! 'तो' फसवणूक करून करायचा ट्रकची परस्पर विक्री : वाई पोलिसांनी तीन ट्रक ताब्यात घेत हडपसर येथून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
वाई ! 'तो' फसवणूक करून करायचा ट्रकची परस्पर विक्री : वाई पोलिसांनी तीन ट्रक ताब्यात घेत हडपसर येथून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgM6i3agQJPb9x0DCmVS8R59zpizsCBbIcs_srK9UP06bfe_qE-yNiLXYyfx4oZFVe0jncgu4zS5YEQkU2ANQc5zQMqw8WKfUznlrmz_P2mjstVsHf8yJGuyByrcpKm2Fczql9RwApU0HmsRam7ueypNMnhJG8G4fH6ffueJ4RwG0Wokq3fZTpLD63QK-P5
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgM6i3agQJPb9x0DCmVS8R59zpizsCBbIcs_srK9UP06bfe_qE-yNiLXYyfx4oZFVe0jncgu4zS5YEQkU2ANQc5zQMqw8WKfUznlrmz_P2mjstVsHf8yJGuyByrcpKm2Fczql9RwApU0HmsRam7ueypNMnhJG8G4fH6ffueJ4RwG0Wokq3fZTpLD63QK-P5=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_78.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_78.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy