बारामती सराफ असोसिएशनच्या वतीने सराफ व्यवसायिकांसाठी सेमिनार चे आयोजन : किरण आळंदीकर यांची माहिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती सराफ असोसिएशन च्या वतीने शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी  हॉटेल बारामती क्लब, बारामती येथे सराफ व्यवसायिकांसाठी विविध विषयांवर आधारित सेमिनार चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष आणि आय बी जे ए चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण आळंदीकर यांनी दिली.
सराफ व्यवसायामध्ये गेल्या दोन वर्षात अनेक बदल झाले असून केंद्र सरकारच्या वतीने अनेक नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्याच्या अधीपत्याखाली राहून व्यवसाय कसा करावा याची माहिती ग्रामीण भागातील व्यवसायिकांना देखील व्हावी या उद्देशाने या सेमिनार चे आयोजन करण्यात आल्याचे आळंदीकर यांनी सांगितले, सराफ संघटनेची शिखर संस्था मानली जाणारी आय बी जे ए या संस्थेचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे समवेत आय बी जे ए चे राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी, संचालक विजय लष्करे, संचालक विजय अग्रवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत.याच दिवशी सराफ व्यावसायिक आणि पोलीस अधिकारी यांचे मधील परीसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले असून, चोरीच्या घटनेच्या पार्शवभूमीवर सराफ व्यवसायिकांनी घ्यावयाची सुरक्षितता,यावर चर्चासत्राचा कार्यक्रम होणार आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असून यावेळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापु बांगर, बारामती चे उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, बारामती शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, बारामती ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, माळेगाव चे पोलीस निरीक्षक किरण अवचर, वडगांव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सुपा पोलीस स्टेशनं चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, करंजेपुल औट पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक योगेच शेलार उपस्थित राहणार असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले.
किरण आळंदीकर यांची आय बी जे ए च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असल्याने बारामती सराफ असोसिएशन च्या सर्व सभासदांच्या वतीने आळंदीकर यांचा जाहीर सत्कार केला जाणार असल्याचे,मा. अध्यक्ष रघुनाथ बागडे, कार्याध्यक्ष सुधीर पोतदार, गोकुळ लोळगे, गणेश बनछोड,गणेश जोजारे, मिलिंद बागडे यांनी सांगितले.याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आय. बी. जे. ए. च्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले जाणार असल्याची ही माहिती आळंदीकर यांनी दिली.
To Top