सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
निरा : विजय लकडे
गणपतीचा आरास करण्याची मनापासूनची आवड असल्याने प्रत्येक वर्षी नवीन देखावा तयार करण्याची परंपरा निरा येथील प्रकाश शिंदे वय ७६ यांनी जोपासली आहे.
यावर्षी भवानी माता छत्रपती शिवरायांना तलवार देत आहे असा हलता देखावा त्यांनी सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी बालचमूसह निरेकरांनी मोठी गर्दी केली आहे. १९७४ ते २०२३ आजतागायत त्यांनी अनेक सांस्कृतिक राजकीय व पौराणिक ऐतिहासिक देखावे सादर करून गणराया चरणी अर्पण केले आहेत. हे देखावे सादर करताना कोणाचीही मदत न घेता ते स्वतः तयार करतात या देखाव्यांची वैशिष्ट्य असे की घरगुती वस्तू. निर उपयोगी व टाकाऊ वस्तु याची जुळवा जुळव करून यापासून ते स्वतः याची दोन महिने अगोदरच तयारी करून कामाला लागतात.
यावर्षीच्या देखाव्यासाठी भवानी मातेचे मंदिर बेटॅम हार्ड बोर्ड कुळ साठी प्लास्टिकच्या टोपली चा वापर करून सुबकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कापडी पडद्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावून भिंतीचा भास निर्माण केला आहे. भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे कट आउट व पेंटिंग ते स्वतः चित्रकार असल्याने स्वतः तयार केली आहेत .
सर्व देखाव्यामध्ये काही घरगुती निरुपयोगी टाकाऊ वस्तु वापरून लाकूड बॅटम हार्ड बोर्ड चा वापर करून एक सुरेख पाण्या योग्य देखावा तयार केला आहे. सोमेश्वर रिपोर्टरच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की कट आउट व पेंटिंग ते स्वतःच तयार करतात कारण यामुळे त्यांना मनासारखं काम करता येतं.
फोटोग्राफीचा व्यवसाय गेली चाळीस वर्षे सांभाळून त्यांनी अगदी हुबेहूब काही राजकीय नेत्यांची , यामध्ये लोकमान्य टिळक. महात्मा ज्योतिबा फुले. बाबासाहेब आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी राजीव गांधी शरद पवार व अजित पवार यांची कॅनवास पेंटिंग देखील तयार केली आहेत. निरा येथील घरगुती गणपती उत्सव देखावा पाहण्यासाठी निरेकरांची गर्दी होत आहे.