सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा-शिवतक्रार गावात जनतेच्या मागणीनुसार व जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या सूचनेनुसार नीरा गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. परंतु यातील काही ठिकाणे वगळली गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
निरा ही पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या गावात चोऱ्यामधील वाढते प्रमाण वृद्ध लोकांना फसवणे, महिलांचे पर्स दागिने पळवणे, घरफोडी, भंगारचोरी वाहनचोरी, आठवडे बाजारातील मोबाईल चोरी महिलांची छेडछाड रस्त्यावरील मारामाऱ्या व रस्त्यावरील अपघात अशा अनेक घटनांना पायबंद घालण्यासाठी जेजुरी पोलिसांनी नीरा ग्रामपंचायतीला संपूर्ण गावामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले होते.
जनतेविषयी आत्मीयता असल्याने जनतेच्या सुरक्षेसाठी नीरा ग्रामपंचायतीने ही पोलिसांच्या सूचनेचा आदर करून मोठी आर्थिक तरतूद करून यामध्ये काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग घेऊन सीसीटीव्ही बसवले होते.
यामध्ये काही ठिकाणचे सीसीटीव्ही चालू स्थितीत आहेत तर काही महत्त्वाची ठिकाणे बसवायची राहून गेलेली आहेत. संपूर्ण निरे मध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी निरा येथील ग्रामस्थांची आहे.
COMMENTS