सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भोर तालुक्यातील राजगड ज्ञानपीठ संस्थेत कार्यरत असणारे प्रा.भानुदास थोपटे,विश्वनाथ दामगुडे, संतोष ओतारी यांना जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
पुरस्काराचे वितरण २४ सप्टेंबरला फरांदेनगर ता. बारामती येथील समता पॅलेसमध्ये होणार असून पुरस्कार्थिंना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बारामती हायटेक टेक्सटाईलच्या अध्यक्ष सुमित्रा पवार असून बँकेचे संचालक संभाजी होळकर, उद्योजक आर.एन. शिंदे, पुरुषोत्तम जगताप, केशव जगताप ,माजी सभापती प्रमोद काकडे, के.एस.ढोमसे,जी.के.थोरात यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे.
COMMENTS