सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यामध्ये माळेगाव, मेडद, खांडज, वडगाव निंबाळकर, निंबुत या ठिकाणी मागील काही दिवसांपासून बिबट या वन्यप्राण्याचा वावर असल्याचे दिसुन आले आहे.
याकरिता खबरदारी म्हणून घ्यावयाच्या उपाययोजना व सुरक्षा याबाबत ध्वनिफीत करण्यात आली असून तालुक्यातील सर्व गणेश उत्सव मंडळांना विनंती करण्यात येते की सकाळी व संध्याकाळी आरतीनंतर 3 मिनिटांची ध्वनिफीत नागरिकांना एकविण्यात यावी व वनविभागाला सहकार्य करावे. असे आवाहन वनक्षेत्रपाल शुभांगी लोणकर व वनपाल प्रकाश चौधरी यांनी केले आहे.
-----------------
ही ध्वनीफित ऐकवावी 👇