सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी विलासर भगत सुनील भगत व संजय भगत यांनी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वात अधिक भुसार माल पुरावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
भगत यांच्या एकत्र कुटुंबाने एक हजार क्विंटल शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथील आडतदार बाळासाहेब फराटे यांच्याकडे पाठवला होता व्यक्तिगत शेतकरी कुटुंबामार्फत एक हजार क्विंटल शेतमाल पुरवठा करणारे भगत कुटुंबीय बारामती तालुक्यात सर्वाधिक शेतमाल पुरवणारे शेतकरी कुटुंब ठरले. बारामती कृषी उत्पन्न समितीची वार्षिक साधारण सभा काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावर्षी प्रथमच सर्वाधिक शेतमाल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पवार स्वर्गीय रामभाऊ भगत यांची आठवण सांगून भगत कुटुंबियांच्या शेती उत्पादनाची वाहवा केली. भगत कुटुंबियांनी सोमेश्वर कारखान्याला पाच हजार टन ऊस घातल्याचा उच्चांकही केला आहे. यावेळी सोमेश्वर चे संचालक सुनील भगत, विलास भगत, संजय भगत यांनी सत्कार स्वीकारला यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती निलेश लडकत, संचालक विनायक गावडे, संतोष आटोळे, सतीश जगताप, विशाल भोंडवे, प्रतिभा परकाळे, सचिव अरविंद जगताप यांचे सह सचिन सातव, संभाजी होळकर, पोपटराव गावडे, दत्तात्रय आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS