सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : प्रतिनिधी
कृषी विभागाच्या माधमातून शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियान या योजनेच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेडनेट व हरितगृह या घटकांकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते. अटल भूजल योजनेच्या माण, खटाव, वाई व महाबळेश्वर या तालुक्यातील ११५ गावांमधील शेतकऱ्यांना या घटकांकिरिता २५ टक्के अतिरिक्त अनुदान येणार आहे.
शेडनेट व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपीक आणि भाजीपाला पिकांचे कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेता येते. ज्या शेतकऱ्यांची जमीन धारणा दोन हेक्टर पर्यंत आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या घटकांचा लाभ घेण्याकरिता महा डी.बी.टी.(Mahadb) या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी सबंधित तालुका कृषी विभागास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.