सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या वर्षी पार पडलेल्या वार्षिक सभेत दिवाळीसाठी १० किलो साखर द्यावी हा निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आला आहे. येणाऱ्या सप्टेंबर २०२४ ला सभासदांनी दिवाळी साखरेबाबत हवा तसा ठराव घ्यावा. मात्र हे करत असताना यात संचालक मंडळाचा कुठलाही स्वार्थ नसून वार्षिक सभेत ठरलेल्या ठरावाची संचालक मंडळ अंमलबजावणी करत असल्याचे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सन २०२१-२२ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १० हजाराचा शेयर १५ हजार करण्याचा निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आला. शासन स्तरावरुन राज्यातील सर्वच साखर कारखान्यावर शेयर वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. ज्या सभासदांनी शेयर च्या माध्यमातून कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्यास मदत केली आहे.अशा सर्वच सभासदांचे मी आभार मानतो. ज्या सभासदांनी शेयर ची रक्कम पूर्ण केली नाही. अशा सभासदांची साखर संचालक मंडळाने बंद केली होती. असे आठ हजार सभासद होते. त्यातील साडेचार हजार सभासदांनी उर्वरित शेयर ची रक्कम भरली. उर्वरित साडेतीन हजार सभासदांचा विषय मासिक सभेत घेऊन दिवाळीसाठी त्यांची साखर कार्ड सुरू करण्यात आलेली आहेत. सहकार चालत असताना सर्वांना समान न्याय द्यावा लागतो. डिस्टलरी विस्तारीकरणासाठी स्वभांडवलाची गरज लागते त्यासाठी ही तरतूद होती. यामध्ये संचालक मंडळाचा यात कुठलाही स्वार्थ नाही. काहींना वाटते यांना प्रकल्प उभारण्याची घाई लागली आहे. हो आम्हाला घाईच लागली आहे. कारण याचा जास्तीत जास्त फायदा सभासदांना देयचा आहे. नेत्यांनी तीन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. नेत्यांच्या त्या विश्वासाला पात्र ठरत करखान्यावरील २९० कोटींचे कर्ज फेडत राज्यात उच्चांकी दर देत आलो आहोत. ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी प्रकल्पांचे विस्तारीकरण चालू आहे. आणि हे सर्व करण्याची मला घाई झाली आहे कारण एक दिवस सोमेश्वर राज्यात उच्चांकी दर देणार आहे याची मला खात्री आहे. असे जगताप यांनी स्पष्ट केले.
COMMENTS