सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
२६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०७.३० ते ०८.१० वा. चे दरम्यान बोपेगाव, ता. वाई गावचे हददीतील हॉटेल कोहीनुर येथे व्ही. आर. एल. ट्रॅव्हल्स क्रमांक २५४८६३ ही नाष्टा करणेसाठी थांबली असताना फिर्यादी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे, वय- ४२ वर्षे, रा. सर्वे नं. ५५/२, भैरवनाथनगर, धानुरी रोड, विश्रांतवाडी, पुणे
यांच्याकडील सिटवर ठेवलेली काळे रंगाची बॅगमधील ते काम करीत असलेल्या सुवर्णा बिल्डकॉम कंपनीचे मशीनरी विक्रीतून आलेले २२ लाख रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेबाबत दिले
फिर्यादीवरुन भुईंज पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६४ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुददेमाल जास्त असल्याने समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा,
श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील आरोपी हे अज्ञात असल्याने त्यांना
निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. त्याकरीता भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यांना आरोपी निष्पन्न करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच
स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील या गुन्हयाचा समांतर तपास करीत होती. तपास पथकाने गुन्हयाच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील सातारा-पुणे हायवे रोडवरील तसेच आरोपींच्या गुन्हा करुन पळुन जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजेस तपासुन आरोपी निष्पन्न
केले. सदरचे आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरी, जि. धार येथील राहणारे असल्याने समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम
उपविभागीय पोलीस अधिकारी वा तसेच पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील तपास पथकाने ८
आक्टोबर २०२३ रोजी गुन्हयातील आरोपी नामे रज्जब हसन खान, वय - ४१ वर्षे, रा. सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश यास धरमपुरी, मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेवुन त्यास भुईंज पोलीस स्टेशन यथे आणुन गुन्हयात अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांचे समक्ष हजर केले असता
त्यांनी त्याची दिनांक ११ आक्टोबर २०२३ रोजी पर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली. पोलीस कोटडी रिमांडचे मुदतीत आरोपीकडे सखोल तपास करुन चोरीस गेलेल्या रकमेपैकी १८ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा,
श्री. बाळासाहेब भालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक विशाल
भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर, यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन केवळ तांत्रिक तपासाच्या आधारे परराज्यातील आरोपीला शोधुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याचेकडुन रोख रक्कम १८ लाख रुपये हस्तगत
करण्याची उल्लेखनीय कामगीरी केल्याबददल कारवाईत सहभाग घेतला