बारामती ! आ. गोपींचद पडळकर यांना बसणार बेताल वक्तव्याचा फटका : माहिती अधिकार कार्यकर्त्याने बजावली कायदेशीर नोटीस : काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांचा अपमान करून बेताल वक्तव्य करणाऱ्या, अनेक नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या व निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणा-या आमदार गोपींचद पडळकर याच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड.असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले,ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. 
        सात दिवसात लेखी माफी न मागितल्यास गोपीचंद पडळकर यांना  न्यायालयात खेचणार असा ईशारा नितीन यादव यांनी नोटिसमधून दिला आहे. पवार कुटुंबीयांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबूजुन बेताल वक्तव्य करणाऱ्या, अनेक नागरिकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करणाऱ्या व स्वतःच्या विधानपरीषद निवडणुक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणा-या भाजपाचा आमदार गोपीचंद पडळकर याच्या विरोधात प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्या वतीने मी आज नोटीस बजावली असुन गोपीचंद पडळकर याने ७ दिवसात.शरद पवार, उपमुख्यमंत्री.अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास मी आमदार पडळकर यास न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.  
 
To Top