सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे पोलिस ठाणे आणि पत्रकार यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी केले.
सुपे येथील पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस आणि पत्रकार संघाच्यावतीने ' मोरया ॲवार्ड ' बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन भोईटे बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे होते.
याप्रसंगी मान्यवरांकडुन पहिल्या तीन क्रमांकाने येणाऱ्या गणेश मंडळांना ट्रॉफी व दोन मंडळांना उतेजनार्थ बक्षिस देण्यात आले. यावेळी काऱ्हाटी अंतर्गत रानमळा येथील हनुमान तरुण मंडळाने प्रथक क्रमांक पटकविला. द्वितीय क्रमांक बोरकरवाडी येथील जय हनुमान तरुण मंडळाने मिळविला. तृतीय क्रमांक सुपे येथील सुवर्णयुग तरुण मंडळाने पटकविला. तर उतेजनार्थ बक्षिस काऱ्हाटीचे महात्मा तरुण मंडळ आणि कुतवळवाडीचे भैरवनाथ युवा प्रतिष्ठाण मोरया गृप यांना विभागुन देण्यात आले.
नागरिक आणि पोलिस यांच्या समन्वय रहावा यासाठी सुप्यात दर शनिवारी तंटा निवारण केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. गावावातील तंटे सामोपचारने मिटविल्याने याचा सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याची माहिती भोईटे यांनी दिली. सुपे पोलिस ठाण्यात सद्या कमी मनुष्यबळ असुन येत्या आठवड्यात त्याची संख्या दुप्पट होणार आहे. त्यानंतर मार्च अखेर पर्यत मनुष्यबळ आणखी अद्यावत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावागावातील ग्राम सुरक्षा दलाचे सक्षमिकरण व्हावे असे त्यांनी सागितले. तसेच सोशल मिडीया आणि सायबर गुन्हे यापासुन सर्वसामान्यांनी दुर रहावे असा सल्ला त्यांनी दिला. तर पत्रकार हा आरशा सारखा असतो. त्याला जे दिसते तिच वस्तुस्थिती मांडण्याचे काम करीत असतो. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात बातमी आली तर त्याची दखल घेणे हे अधिकाऱ्याचे काम असते असे बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार जयराम सुपेकर, गणेश आळंदिकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकामी पत्रकार दिपक जाधव, सचिन पवार, परिक्षक अशोक लोणकर आणि अमोल कांबळे आदींचे सहकार्य मिळाले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश जगताप, हेमंत गडकरी, गोरख जाधव, विजय मोरे, काशिनाथ पिंगळे आदींसह सर्व सद्स्य, नवनिर्मित पोलिस ठाण्याचे कर्मचारी, गावोगावचे पोलिस पाटील व गणेशमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे, सपोनी नागनाथ पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संतोष शेंडकर यांनी केले. स्वागत सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील, उपनिरिक्षक नागेश कोळी यांनी केले. तर आभार चिंतामणी क्षिरसागर यांनी मानले. ...........................