सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतीकडून वाटप करण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी बीलां विरोधात नागरिकांच्या प्रक्षोभक प्रतिक्रिया येवून काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीसमोर लोणंदकर नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता तरीही लोणंदकरांच्या पदरी निराशाच पडलेली. मात्र लोणंद येथील जेष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील यांनी थेट मुंबई गाठत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोणंदच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस तात्काळ स्थगिती मिळवली.
आज मुंबई येथे मंत्रालयात आ. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी सभापती, समाजकल्याण आनंदराव शेळके-पाटील, विराज शिंदे, किसन वीरचे संचालक राहुल घाडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लोणंद येथील अवाजवी चतुर्थ वार्षिक कर वाढीबाबत निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्थगिती देत प्रधान सचिवांना फेर सर्व्हेक्षण करण्यासंदर्भात आदेश दिले. यावेळेस त्यांच्याबरोबर नगरसेवक प्रवीण व्हावळ, नगरसेवीका राजश्री शेळके-पाटील, युवा नेते संदीप शेळके-पाटील, साजिद बागवान, हर्षवर्धन शेळके-पाटील, निलेश शेळके-पाटील, दिपक डोणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळेस अनेक दिवसांपासून नीधी अभावी प्रलंबित असलेल्या लोणंद बस स्थानकासाठी पाच कोटी रूपयांच्या निधीस तातडीने प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल आनंदराव शेळके-पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.