सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर कारखाना उभारण्यात माझे कुटुंबातील वडील रामराजे जगताप यांनी जमीन दिली. जमीन देणाऱ्यांच्या कुटुंबातून मी आलो आहे जमीन बळकवणाऱ्या कुटुंबातून नाही. सतीश काकडे स्वतः चेअरमन झाले नसल्याची खंत त्यांच्या मनात असल्यामुळे नैराश्यातून ते खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवत स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा केलवाना प्रयत्न करत आहेत. असा आरोप सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केला.
दि १२ रोजी ते कारखाना कार्यस्थळावर अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. जगताप पुढे म्हणाले, पवार कुटुंबियांना वारंवार विरोध करूनही तुम्हाला संधी दिली आहे याची जाण ठेवावी. स्वतः सतीश काकडे हे तडजोड करून संचालक झाले व आताही त्यांचे चिरंजीव संचालक मंडळात आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मालकीचे असलेले काकडे महाविद्यालय व महाविद्यालयाची १४ एकर जमीन, इमारत, सभासदांच्या मालकीचे असून
याच ठिकाणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी याच महिन्यात सभा बोलवावी. सर्व सभासद यांच्या उपस्थितीत खुल्या चर्चेस तयार असल्याचे प्रति आव्हान सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिले आहे.
काकडे महाविद्यालय बांधण्यात आलेले कर्जही सोमेश्वर कारखाना सभासदांनी फेडले आहे. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ वार्षिक सभेत सभासदांपुढे अहवाल सादर करते मात्र काकडे महाविद्यालयाने आजपर्यंत एकदाही वार्षिक सभा घेतली नाही वा हिशोब पत्रके मांडली नाहीत. सतीश काकडे हे काकडे महाविद्यालयाला आपल्या घरचे संस्थान समजतात का? असा सवाल जगताप यांनी केला आहे. काकडे महाविद्यालयाची बाब न्यायप्रविष्ठ आहे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे लवकरच काकडे महाविद्यालय सभासदांचे असेल सभासदांच्या ऊस बिलातून पैसे कपात झाल्यामुळेच कारखान्याच्या संस्था उभ्या आहेत. सभासदच कारखान्याचे मालक आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सभासदांच्या सहकार्यामुळे तीन वेळा तर विरोधकांच्या सहकार्याने एक वेळा अशी चार वेळा सोमेश्वरच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे ते सांगतील त्या क्षणाला पायउतार होण्याची तयारी असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
COMMENTS