सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बामणोली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ट्रेकर्स व पर्यटकांना भुरळ घातलेला व्याघ्रगड किल्ले वासोटा हा १६ ऑक्टोंबर पासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्रात घनदाट जंगलात वसलेला हा किल्ला असून याचे व्यवस्थापन हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय बामणोली यांचे मार्फत केले जाते. या संपूर्ण परिसरामध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी असल्याकारणाने १५ जून ते १५ऑक्टोंबर या कालावधीत पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव किल्ले वासोटा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येतो. सध्या कडक उन्हाळा व थंडी सुरू झाली असून बहुसंख्य लोक हे थंडीच्या दिवसात खूप ठिकाणच्या गडकिल्ल्यांवर दुर्ग भ्रमंतीसाठी जातात याच प्रकारे किल्ले वासोटा या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेकर्स व पर्यटक लोक येत असतात. किल्ले वासोटा वर जाण्यासाठी शिवसागर जलाशयातून बोटीच्या सहाय्याने जावे लागते त्यानंतर किल्ले वासोटा पायथा मेट इंदवली इथून घनदाट जंगलातून तास दीड तासाचा ट्रेक करत केले वासोट्यावर पोहोचता येते केले वासोट्यावर पोचल्यावर किल्ल्यावरून पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील गावे दिसतात तसेच किल्ल्यावर शिवकालीन शंभू महादेवाचे मंदिर, दोन पाण्याची तळी, प्रसिद्ध बाबू कडा इत्यादी ठिकाने पर्यटकांना पाहता येतात. किल्ले वासोटा या ठिकाणी शिवसागर जलाशयातून पलीकडे ये जा करण्यासाठी भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्रविमश्वर बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे तालुका जावली या तीन संस्थांच्या माध्यमातून बोट उपलब्ध करून दिल्या जातात . शिवसागर जलाशयातून पलीकडे गेल्यावर वन विभागाची परवानगी घ्यावी लागते त्या परवानगीची व्यवस्था ही पायथ्यालाच करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी परवानगी घेऊन नंतर किल्ले वाचवण्याचा ट्रेक सुरू करता येतो परवानगी शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारचे वाढ करण्यात आली नसून मागील वर्षीचे शुल्क यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी दिग्विजय बाटे यांनी दिली.
----------------------
बामणोली येथूनच वासोट्याला सर्वाधिक पर्यटकांची पसंती.
किल्ले वासोटा या ठिकाणी जावयाचे असल्यास पर्यटकांनी आजवर बामणोली या ठिकाणाचीच जास्त प्रमाणत निवड केली आहे .अभयारण्य व नंतर व्याघ्र प्रकल्प झाला किंवा जेव्हापासून लोक वासोटा पाहण्यासाठी येत आहेत तेव्हापासून आज अखेर
बामणोली या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येत पर्यटक हे सुरक्षित जाऊन परत सुरक्षित परत आलेले आहेत.त्यामुळे हेच पर्यटक बामणोली येथूनच ये जा करा असा सल्ला इतर पर्यटकांना देतात त्याचे कारण असे की,सातारा ते बामणोली पूर्ण डांबरी रस्ता, या ठिकाणी सर्व मोबाईलला फुल्ल नेटवर्क, गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र, याच ठिकाणी १०८ रुग्णवाहिका देखील २४ तास उपलब्ध, इतर कोणतीही अडचण आल्यास खाजगी वाहने देखील उपलब्ध त्यामुळे पर्यटक हे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बामणोली या ठिकाणाहूनच जास्तीचा प्रवास करतात.
धनाजी संकपाळ
अध्यक्ष भैरवनाथ बोट क्लब बामणोली
COMMENTS