सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
सोनवडी सुपा एका विवाहितेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार छळ करून मारहाण केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसात पती, सासू-सासरा, दोन दिर व जाऊ अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सोनवडी सुपा येथील एका ३२ वर्षीय विवाहतेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी
पती महेश बाळासो पवार, सासू कांताबाई बाळासो पवार,सासरे बाळासाो पंढरीनाथ पवार, दिर योगेश बाळासो पवार, व रमेश बाळासाो पवार, प्राजक्ता योगेश पवार सर्व रा सोनवडी सुपा ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हणटले आहे, दि. 26/02/2012 रोजी नंतर दोन महिन्यांनी ते दि. 06/10/2023 रोजी पर्यन्त सासरी सोनवडी सुपा ता. बारामती जि. पुणे येथे माझे पती महेश बाळासो पवार, सासू कांताबाई बाळासो पवार, सासरे बाळासाो पंढरीनाथ पवार, दिर योगेश बाळासो पवार, व रमेश बाळासाो पवार, प्राजक्ता योगेश पवार सर्व रा सोनवडी सुपा ता.बारामती जि.पुणे यांनी मला शेतातील काम येत नाही म्हणून व कर्जाचे हप्ते फेडणेसाठी माहेरून पैसे आण असे म्हणून मला वेळोवेळी हातानी लाथाबुक्यानी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देवून मला उपाशी पोटी ठेवून मला क्रूरतेची वागणुक देवून माझा शारीरीक व मानसिक छळ केला म्हणून माझी पती महेश बाळासो पवार, सासू कांताबाई बाळासो पवार, सासरे बाळासाो पंढरीनाथ पवार, दिर योगेश बाळासो पवार, व रमेश बाळासाो पवार, सर्व रा सोनवडी सुपा ता.बारामती जि. पुणे याचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे.
COMMENTS