सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या सोमेश्वर पब्लिक स्कूल या विद्यालयात विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून न देण्याचा संताप जनक निर्णय शालेय प्रशासनाने घेतला असल्यामुळे याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवार( दि. २८) रोजी पालकांनी थेट विद्यालयात येत याबाबत शिक्षकांना जाब विचारला. मात्र शिक्षकांनी नेहमीप्रमाणेच टोलवाटोलवीची उत्तर देत कारखान्याच्या संचालक मंडळांनेच हा निर्णय घेण्यास सांगितले असल्याचे पालकांना सांगितले. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. इंग्रजी माध्यम विद्यालय सोमेश्वरनगर परिसरातील एक नावाजलेले व जुने इंग्रजी माध्यमाचे विद्यालय असून या विद्यालयात जवळपास नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाला ग्रँड नसल्याने विद्यार्थ्यांच्या फीवरच या शाळेचे कामकाज चालते तसेच शिक्षकांचे पगारही यातूनच होतात त्यामुळे पालकांनीही वेळेत विद्यार्थ्यांची फी भरावी अशी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. फी भरण्यासाठी शाळेने आम्हाला वेळ द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. तर यावर संचालक मंडळाशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन शाळा समितीने दिले आहे. फी न भरल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार दुर्दैवी असून बारामती सारख्या प्रगत तालुक्यात हे न शोभणारे आहे. याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केले आहे.