खंडाळा ! अंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाळासो होवाळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
अंदोरी ता खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासो धोडिंबा होवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
                अंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सरपंचादासाठी बाळासो होवाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच सोनाली बोडके,किसन ननावरे,सुचेता हाडंबर,सुप्रिया धायगुडे, वैशाली धायगुडे, संध्या खुंटे,नामदेव नरुटे, कैलास भिसे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणुक अधिकारी म्हणुन महादेव चौधरी यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी रविंद्र धायगुडे यांनी सहकार्य केले.
            यावेळी शामराव धायगुडे, बाळासो ननावरे,डॉ नानासो हांडबर,काशिनाथ धायगुडे, नानासो ननावरे, मस्कु बोडके, अशोक धायगुडे,विश्वास दगडे, धनाजी जाधव,वसंत दगडे, संजय जाधव, तानाजी ठोंबरे,रविंद्र दगडे, सोपान धायगुडे,नवनाथ ससाणे, सुरेश नरुटे,बाळासो सुतार, सिताराम होवाळ, तुळशीराम होवाळ आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
To Top