सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येणाऱ्या हंगामात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात तुटणाऱ्या ऊसाला तसेच नोव्हेंबर नंतरच्या ऊस लागवडीला तसेच खोडव्याला अनुदान देण्याचा संचालक मंडळाचा विचार असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता. बारामती येथील सोमेश्वर कारखान्याचा ६२ वा गळीत हंगाम पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप या उभयतांच्या हस्ते पार पडला त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सुनील भगत, शिवाजीराजे निंबाळकर, अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, अजय कदम, शैलेश रासकर, विश्वास जगताप, जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, अनंत तांबे,
पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले,
सद्या सोमेश्वर कारखान्याचया कार्यक्षेत्रात दोन ते सव्वा लाख टन ऊस कमी झाला आहे. पाण्याअभावी काही सभासदांचा ऊस जळाला, काहींनी चाऱ्याला दिला तर काहींनी गुऱ्हाळाला दिला. सद्या सोमेश्वरकडे ३७ हजार एकरातील साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. तसेच गेटकेन दीड ते दोन लाख टन उपलब्ध करून १४ लाख टन ऊस गाळपाचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच एकरी ३७ ते ४१ टनाची सरासरी होती. यावर्षी एकरी ३३ टन बसण्याचा अंदाज शेतकी विभागाने वर्तवला आहे. सद्या कमी पावसामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष आहे त्यामुळे मंत्री समितीने १ नोव्हेंबर पासून ऊस गाळापासाठी परवानगी मिळावी. असे सांगत येणाऱ्या गाळप हंगामासाठी सोमेश्वरकडे ९५० बैलगाडी, ४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ४०५ डंपिंग तसेच १७ हार्वेस्टर यंत्रणाचे करार पुर्ण झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन ९ हजार टनाच्या सरासरीने गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. शेजारील साखरवाडी, माळेगाव, खंडाळा, पटास, शरयू या कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे कमी दिवसात जास्त गाळप होणार आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.
-------------------
वाघळवाडी ग्रामपंचायतीला कारखान्याच्या मालकीची जागा देण्याचा ठराव वार्षिक सभेत करण्यात आला. सोमेश्वर कारखान्याचे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, काकडे कॉलेज, विद्या प्रतिष्ठान याठिकाणी जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच कारखाना कॉलनी, कारखाना कामगार, दुकान र
या फिल्टर पाणी पुरवठा योजनेमुळे जवळपास कारखान्यांशी निगडित असलेल्या १३ हजार लोकसंख्येला या पाण्याचा वापर होणार आहे. त्या पद्धतीचा आपण वाघळवाडी ग्रामपंचायतशी करार केला आहे. त्याच बरोबर कारखाना मालकीची ५० गुंठे जागा ही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्याचे ठरले आहे.