सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील बापूराव मुरलीधर तांबे वय ४२ वर्षे रा. जेऊर ता पुरंदर यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महतेचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास नीरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मोकाशी करत आहेत.