सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
बारामतीच्या ‘मोढवे’ या गावातील मरिमाता मंदिरात चोरी झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरांनी रात्री तब्बल 20 ते 21 किलो चांदीचा ऐवज चोरी झाल्याचे सांगण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
तालुक्यातील मोढवे या गावात जागृत देवस्थान अशी ओळख असलेले मरी माता हे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे सोमवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात चोरांनी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून चांदीचे मखर चोरी केल्याचे आज समोर आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
बारामतीच्या पश्चिम भागात या चोरीच्या घटनेमुळे भीतीचे सावट पसरले आहे. आज संपूर्ण दिवसभर विविध पोलीस पथकामार्फत या घटनेचा तपास सुरू होता. या घटनेबाबत मात्र पोलीस प्रशासनाने भूमिका व माहिती देणे टाळले.
COMMENTS