सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : धर्मेंद्र वरपे
खंडाळा तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव या गावातील प्रशासनाकडून रखडलेल्या विविध विकास कामांच्या पुर्णत्वासाठी नायगाव ग्रामपंचायत सरपंच सदस्यासह ग्रामस्थ आजपासून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
झोपलेल्या प्रशासनाला अधिकरी वर्गाला जागे करण्यासाठी आणि मनमानी करुन सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगावच्या विकास कामांत राजकारण आणून गावाला विकास कामापासून वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी आम्ही हे उपोषण करीत असल्याचे सरपंच व ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत जलजिवन मिशन योजनेंतर्गत १ कोटी १८ लक्ष रुपये मंजूर असलेल्या नायगाव पाणीपुरवठा योजनेची व विहिरीवरची स्थगिती उठवून मंजुर असलेल्या ठिकाणीच विहिरीचे काम सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत मंजुर असलेल्या व अर्धवट पुर्ण झालेल्या नायगाव मधील विकास कामांवर अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे आलेली अघोषित स्थगिती उठवून सदर उर्वरित विकास कामे तात्काळ चालू करण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
COMMENTS