सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे चोरट्याने घरे फोडल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री (दि. २१) रोजी करंजेपुल व शेंडकरवाडी परिसरातील अनेक घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक रमाकांत गायकवाड यांच्या घराचा देखील समावेश आहे.
करंजेपुल येथे रमाकांत गायकवाड व त्यांच्या भावाचे घर फोडून चोरट्यांनी ७० हजाराची रक्कम, ३ लाख रुपये किमतीची चांदीची भांडी व कपडे असा ऐवज लंपास केला तर विकास गायकवाड यांची मोटारसायकल चोरली मात्र पेट्रोल संपल्याने मोटारसायकल सोडून चोर पळाले. तर शेंडकरवाडी येथे गणेश शेंडकर यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला गेला.