सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
महामाता रमामाई भिमराव आंबेडकर स्मारक समिती वाडिया कॉलेज पुणे येथे भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक लेखक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील मुरूम येथील नासिर इनामदार यांचा संविधान रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना नासिर इनामदार म्हणाले, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना मिळणारी कौतुकाची प्रत्येक थाप ही समाजासाठी सतत झटत राहण्याची ऊर्जा उर्मी आणि उत्साह देत असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासारख्या चळवळीतल्या असंख्य सहकाऱ्यांचा तसेच आजपर्यंत माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक कार्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं असणाऱ्या आणि मोलाची साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.