Baramati News ! विद्या प्रतिष्ठानच्या समृद्धीची सुवर्ण कामगिरी : उत्तरप्रदेशमध्ये पार पडलेल्या लेवल ज्यूदो स्पर्धेत सुवर्णपदक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ४ मध्ये शिकणारी समृद्धी प्रवीण सावंत हिने दिनांक २२/११/२०२३ ते २६/११/२९२३ यादरम्यान मॉडर्न स्कूल, नोएडा, उत्तर प्रदेश येथे सी.बी.एस.ई तर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल ज्यूदो स्पर्धेमध्ये ११ वर्षाखालील २५ किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.
          या स्पर्धेमध्ये सीबीएससीच्या ९ झोन मधून स्पर्धक सहभागी झाले होते. समृद्धीने उत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरी सुवर्णपदकाची कमाई केली.
समृद्धीला शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळांनी समृद्धीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
To Top