Baramati News ! दीपक जाधव ! संगणक परिचालकांचे बेमुदत कामबंद आंदोलन : तालुक्यातील ग्रामपंचायत कामकाजावर परिणाम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केल्याने ग्रामपंचायत कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबुन राहिली आहेत. 
           संगणक परीचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे ह्या प्रमुख मागण्यांसाठी १७ नोव्हेंबर पासुन राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीतील संगणक परीचालकांनी संप पुकारला आहे. बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक या संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतवर झालेला दिसून येत आहे.
         संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक काम करीत आहेत. शासनाने त्यांना ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंध कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे तसेच सदर दर्जा मिळेपर्यंत मासिक २० हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे शासन आश्वासन देऊनही दुर्लक्ष करित आहे.  सुधारित आकृतीबंधाबाबत काहीच हालचाल झालेली दिस्य्न येत नाही. त्यामुळे शासन वेळकाढुपणा करीत असल्याची भावना संगणक परीचालकांनी व्यक्त केली.
        संगणक परिचालकांना एकिकडे कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यायचे नाही व दुसरीकडे केवळ ६ हजार ९३० रुपये मासिक मानधन द्यायचे. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली आहे. परंतु संगणक परिचालकांकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती बारामती संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भोसले व सुपा ग्रामपंचायत संगणक परिचालक शेखर राऊत यांनी दिली. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तो पर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
         ...............................
To Top